फुलंब्री, (प्रतिनिधी) तालुक्यातील बोधेगाव येथे शनिवारी (दि. २१) रोजी रमजान ईद निमित्त सकाळी सव्वा आठ वाजता हाफिज नदीम शेख यांनी नमाज पठाण करीत सर्व मानव जातीच्या कल्यानाची दुआ करीत सण साजरा करण्यात आला. तसेच मुस्लिम बांधवांच्या वतीने जातीय सलोखा अबाधित रहावा यासाठी ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला विविध समाजाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित असल्याने एकतेचे दर्शन घडले. याप्रसंगी माजी सरपंच राजेंद्र वाघ, ग्रा. पं. सदस्य अंकुश कुंटे, कैलास कुंटे, डॉ. किरण राजपूत, फिरोजखान, राजू कुंटे, माजी सरपंच प्रभाकर कुंटे, कल्याण कुंटे, बाबासाहेब कुंटे, प्रशांत पाठक,, चरणसिंग राजपूत, काकासाहेब ढेपले, विनोद कुंटे, लक्ष्मीकांत कुंटे, दीपक ढेपले, भानुदास वाघ, डॉ. संजय जाधव, योगेश ढेपले, इरफान शहा, फईम शेख, तारेक पठाण, अहेमद पठाण, अय्युब शहा, आबेद अली टेलर, अमजद पठाण, भानुदास वाघ, अस्लम शेख, सरदार शेख, चांद शेख, शारेक पठाण, व मोठ्या संख्येने सर्व जाती धर्मातील बांधव उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे नवनियुक्त उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल यांनी रमजान ईद निमित्त घेतल्या सर्कल मधील मुस्लिम बांधवांच्या भेटी गाठी ठीक ठिकाणी त्यांनाही उपाध्यक्षपदी निवड झाल्याने मुस्लिम बांधवाकडून शुभेच्छा देण्यात आल्या.














